19-02-2018 - 19-02-2018

रणरागिणी आणि यशवंत पुरस्कार सोहळा.. १९ फेब्रुवारी 2018 रोटरी क्लब ऑफ हिलसाईड आणि उत्कर्ष महिला मंच च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना रणरागिणी पुरस्कार आणि पुरूषांना यशवंत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल अभय गाडगीळ उपस्थित होते. प्रेसिडेंट रो. शारदा चव्हाण आणि सहकारी यांच्या पोवाडयाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेच्या विद्यार्थी व महेश पाटील सर यांनी सिंहगडावरून ज्योत प्रज्वलित करून आणली. रो. संजय डोळे यांनी सुत्रसंचालन तर मान्यवरांच्या ओळखी रो. अपर्णा धुपकर आणि मा. ऐश्वर्या चव्हाण यांनी केले. रो. पूजा गिरी व रो देवीदास भालेराव यांनी मुलाखती घेतल्या. शिवस्तुती, कथ्थक, लावणी च्या सांस्कृतिक कार्यक्रमा नंतर रो. आदिती रहाणे यांनी आभार प्रदर्शन केले. अनेक कलबचे प्रेसिडेंट, ए.जी. डिस्ट्रिक्ट अॉफिसर, रोटेरीयन्स, अॅन, अॅनेटस व इतर मान्यवर उपस्थित होते. (१९ फेब्रु २०१८)

Project Details

Start Date 19-02-2018
End Date 19-02-2018
Project Cost 180000
Rotary Volunteer Hours 600
No of direct Beneficiaries 10000
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Club Thrust Area